वर्धा- भारतीय सैन्यासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्णिबाण, दारुगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव परिसरातील केंद्रीय दारुगोळा भांडारात मंगळवारी (ता.२०) पहाटे साडेपाचच्या सुमारास जुने बॉम्ब निकामी करताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दोन कर्मचाऱ्यांसह दोन कामगारांचा समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
जखमींमध्ये स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे.
जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटामुळे परिसरात
हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भारतीय लष्करासाठी पुरवठा होणाऱ्या दारुगोळ्याचे भांडार पुलगावमध्ये आहे. या शस्त्र भांडाराजवळ ऑर्डिन्स फॅक्टरीची रेंज आहे. या ठिकाणी जुने झालेले बॉम्ब निकामी करण्यात येतात. जबलपूर ऑर्डिन्स फॅक्टरीतून काही कर्मचारी जुनी स्फोटके निकामी करण्यासाठी पूलगावमध्ये आले होते. त्यातील एक बॉम्ब निकामी करतांना स्फोट झाला.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे घडली दुर्घटना
याआधी देखील जून २०१६ मध्येदेखील पुलगावच्या
शस्त्र भांडाराला आग लागली होती. आगीनंतर परिसरात मोठे हादरे बसले होते. त्यावेळी
स्फोटाचे हादरे १५ किलोमीटरपर्यंत जाणवले होते. आग लागलेल्या ठिकाणाहून दारुगोळा
अन्यत्र हलवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. स्फोटके निकामी
करण्याच् काम कंत्राटदाराकडून करुन घेतले जाते. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही
दुर्घटना घडल्याची चर्चा आहे.
स्फोटातील
मृतांची नावे: प्रभाकर वानखेडे , राजकुमार भोवते, विलास पधारे, नारायन पचारे, प्रवीण मुंजेवार
स्फोटातील
जखमींची नावे: विकास बेलसरे, संदीप पचारे, अमित भोवते, रूपराव नेताम, दिलीप निमगडे, मनोज मोरे
















